*माऊली आज पासून मी तूझी झाली*.
गाडीतून जाताना कंबरेतून वाकलेली एक आजी भर पावसात अंग प्लॅस्टिक पिशवी ने झाकलेली, एसटी बस थांब्यावर उभी असलेली दिसली. इतका तुफान पाऊस पडत असताना ही आजी का उभी आहे हा प्रश्न मला पडला. गाडी मागे घेऊन मी तिला विचारले असता.. उत्तर ऐकून वाईट वाटले .. म्हणाली राॅकेल आणायला अलिबाग ला चालली आहे. मी तिला गाडीत बसवलं आणि विचारलं राॅकेल कशाला ? आजी म्हणाली माझा संसार हा राॅकेल वरचा आहे, चूल पेटवायला, रात्री दिवा लावायला..
मी विचारले आजीला, घरात कोणीही नाही का?? ती म्हणाली यजमान गेले....एक मुलगीही गेली.....मी एकटीच राहते...

"कसे एकटी जगतात ही माणस..विचार सुद्धा करवत नाही".
मुंबईत लाईट गेली तर ५ मिनिटं व्हायच्या आत आपण एमएसइबी ला फोन करून वैतागतो... इथे ही 75 वर्षाची आजी विनातक्रार राॅकेल चा दिवा लाऊन शांत व आनंदात रहाते ऐकून मलाच नकळत धिर मिळत होता...
मग अलिबाग ला पोहोचल्यानंतर आजी रेशन दुकानात राॅकेल घेण्यास उतरल्या. सरकारी नियमानुसार १ लिटरच राॅकेल मिळते पण वयोवृद्ध आजीची परिस्थिती बघून "जगे" नामक दुकानदारांनी तिला २ लिटर रॉकेल दिले. आजीला आनंद झाला. लगेचच तिने दुकानदाराला आशिर्वाद देऊन टाकले...
आजीला म्हटलं चल मी घरी सोडते तुला.. कारण मला अजून खूप काही शिकायचे होते. ....
कशाला उगाच तुम्हाला त्रास... एक ना दोन असं हो ना करता शेवटी आजी गाडीत बसल्यावर मग मी तिला विचारलं फक्त १ लिटर रॉकेल साठी एवढ्या लांब येतेस ?
माहिती घेता घेता तिच्या गावापर्यंत पोहोचलो. तिच्या घरी जाताना पर्वतीच्या पायर्यांसारख्या २० - २२ पायर्या लागल्या. तिच्या घरी पोहोचल्यानंतर अक्षरशः डोळ्यात अंजन घातलं गेलं.
६ × ९ ची तिची खोली.. प्लास्टर नाही.. घरात पाण्याचे कनेक्शन नाही.. लाइट म्हणजे एक ४० चा बल्ब पण त्याचेही बटण दुसर्याच घरात... तिची १एकरभर भातशेती पण प्रत्यक्षात जेमतेम वर्षभरही कसंबसं पुरेल इतकाच भात तिच्या वाट्यास येतो.. बिचारी त्यावरचं भागवते..
आजी पैशाने गरीब असली तरी मनाने फार श्रीमंत आहे.....आणि आपण लहान लहान दूःखात रडत असतो.....
मला जाताना म्हणाली पोरी घरचा तांदूळ घेऊन जा... काय बोलावे या कर्णाच्या अवताराला.. शेवटी मुठभर तांदूळ घेऊन पाया पडले तिच्या... आपण छोट्या छोट्या गोष्टीत देवाला दोष देतो.. पण या आजीची देवाकडे कसलीच तक्रार नाही.. अशा परिस्थितीतही रोज मनोभावे पूजा करून मगच जेवते आजी..
शेतकऱ्यांकडून मला सत्कारात शाल आणि श्रीफळ मिळाले होते ते शाल-श्रीफळ मी आजीला दिली आणि निघाले... एक नवी उमेद घेऊन....
मी निघतानाही आजी म्हणाली मी सोडायला येते गाडीपर्यंत... आणि हट्टाने चार पायर्या काठी टेकत उतरलीही... काय म्हणावे अशा माऊलीला....
जाता जाता आजीला एवढेच म्हटले.....माऊली आज पासून मी तूझी झाली.....कधीही हक्काने बोलव कुठेही असेन नक्कीच येईन तूझ्या मदतीला...
.
Journalist - Asmita Puranik.

SOCIALIZE IT →